Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडबालेपीर भागात भरदिवसा घरफोडी सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम पळवली

बालेपीर भागात भरदिवसा घरफोडी सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम पळवली


बीड (रिपोर्टर):- बालेपीर भागातील अमराई परिसरात काल दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली असून चोरट्याने घरातील सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम चोरून नेली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख रजिया जिलानी या घराला कुलूप लावून गेल्या असता याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, पाच ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, नगदी 20 हजार रूपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. परत आल्यानंतर शेख रजिया यांना आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!