Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा रूग्णालयातील परिचारीकांची निदर्शने नगर येथील कर्मचार्‍यांवरील कारवाई मागे घ्या

जिल्हा रूग्णालयातील परिचारीकांची निदर्शने नगर येथील कर्मचार्‍यांवरील कारवाई मागे घ्या


बीड (रिपोर्टर):- नगर जिल्हा रूग्णालयामध्ये दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेला दोषी धरून तेथिल कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली. सदरील ही कारवाई बेकायदेशीर असून कारवाई रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन करत रूग्णालयासमोर तिव्र निदर्शने केली. या आंदोलनात जिल्हा शल्यचिकित्सकांसह आदींचा सहभाग होती.

गेल्या काही दिवसापूर्वी नगर येथे जिल्हा रूग्णालयाच्या आयसीयु विभागात आग लागली होती. या प्रकरणाला दोषी धरून तेथील काही कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली. सदरील ही कारवाई अन्यायकारक असून कर्मचार्‍यांवर दाखल केलेले गुन्हे परत घेण्यात यावे या मागणीसाठी आज जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी रूग्णालयासमोर तिव्र निदर्शने केली. या आंदोलनात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांच्यासह संघटनेचे सुरेश आंधळे, राजेंद्र औसरमल, निलेश जाधव, सत्यशिला मुंडे, मॅथो सुरेखा लष्करे यांच्यासह आदींचा सहभाग होता.

Most Popular

error: Content is protected !!