Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपोलिस म्हणतात त्या नोटा बच्चो की बँकच्या, मग माध्यमांना का दाखवत नाहीत?,...

पोलिस म्हणतात त्या नोटा बच्चो की बँकच्या, मग माध्यमांना का दाखवत नाहीत?, 24 तास उलटूनही संशयीत शिरुर पोलीसांच्या ताब्यातच, ना गुन्हा दाखल, ना संशयीतांची सुटका


बीड/शिरूर (रिपोर्टर):
बनावट नोटा प्रकरणी पाचजणांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना मंगळवारी शिरूर तालुक्यातील रायमोहा येथे घडली होती. पोलीसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांचीच इतरांनी फसवणूक केली असल्याचे समोर आले. या प्रकरणी आज (दि. 18 नोव्हेंबर) दुपारी 12.30 पर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता पोलीस म्हणतात त्या नोटा मुल्य नसलेल्या ( बच्चो की बँकच्या) आहेत, मग त्या माध्यमांना का दाखवत नाहीत. संशयितांवर या प्रकरणी गुन्हाही दाखल होणार नसल्याचे पोलिस सांगतात तर मग त्या संशयीतांना 24 तास झाले तरी पोलीसांनी ताब्यात का ठेवले? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

मंगळवारी बीड कंट्रोलमधून शिरूर पोलीसांना फोन गेल्यानंतर पोलीसांनी रायमोहा येथून रात्री 10.30 वा. पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तिप्पट पैसे करून देण्याच्या लालसेपोटी त्या पाचजणांची लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे फसवणूक झाली असल्याचे समजते. ते पाच जण रायमोहा येथे दुसर्‍यांची फसवणूक करत होते का? या प्रकरणी पोलीस काहीच सांगण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडे लहान मुलांच्या खेळणीच्या नोटा सापडल्या की बनावट छापलेल्या नोटा सापडल्या या संदर्भातही पोलीस काहीच बोलण्यास तयार नाहीत. संयशितांवर गुन्हाही दाखल नाही तरी देखील 24 तास उलटूनही आरोपींना पोलिसांनी सोडले नाही. त्यांना न्यायालयातही हजर केले नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलीसांची भुमिका संशयास्पद असल्याचे बोलेले जात आहे. या संदर्भात रिपोर्टरने शिरूरचे ठाणे प्रमुख सिद्धार्थ माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

Most Popular

error: Content is protected !!