बीड (रिपोर्टर):-बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विविध गुन्ह्यातील आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. आंबाजोगाई येथील दोघा जणांना हार्सुल कारागृहात पाठवण्यात आले. त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. हे दोघे अनाधिकृतपणे हातभट्टी दारु विक्री करत होते. त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होतो.
सटवा भागवत मेंडके (वय 45 वर्षे, रा. मोरेवाडी ता. अंबाजोगाई) व राजाभाऊ रामदास आडे (वय 36 वर्षे, रा. गायरान, राडी तांडा ता. अंबाजोगाई) या दोघाविरुध्दात स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. मेंडके याच्या विरुध्द अंबाजोगाई शहर तर आडे याच्याविरुधद आंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल आहेत. स्थानबध्दतेबाबत त्याच्या विरुध्द कारवाईकरण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होत. सदरील कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेहरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक घोळवे, रामा पडवळ यांनी केली.