Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकेजमध्ये पाटील विरुध्द महाआघाडी स्थापन होणार?

केजमध्ये पाटील विरुध्द महाआघाडी स्थापन होणार?


केज (रिपोर्टर)ः- नगर पंचायतीच्या निवडणुका घोषीत झाल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड प्रमाणात वेग आला. बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायती पैकी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. केज नगर पंचायत पाच वर्ष खासदार रजनीताई पाटील यांच्या ताब्यात होती. या निवडणुकीत आता ही नगर पंचायत कोणाकडे जाते याकडे लक्ष लागून आहे. पाटील यांच्या विरोधात महाआघाडी स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महाआघाडीत आडसकर, ईनामदार, रंजीत पाटील, इंगळे यांचा समावेश असणार आहे.


राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुका घोषीत झाले असून ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहे. त्या त्या ठिकाणी राजकीय वातावरण चांगलेच तापले. बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहे. केजची नगर पंचायत पाच वर्ष माजी मंत्री अशोक पाटील , खा.रजनीताई पाटील यांच्या ताब्यात होती. आता या निवडणुकीमध्ये काय होतयं याकडे लक्ष लागून आहे. पाटील यांना टक्कर देण्यासाठी महाआघाडी स्थापन होत असल्याच्या हालचाली सुरू आहे. ही महाआघाडी भाजपाचे नेते रमेश आडसकर, अंकुश इंगले, हारुण ईनामदार, रंजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे संागण्यात येते. नगर पंचायत निवडणुकीत किती पॅनल पडणार हे अजून स्पष्ट झाले नसले तरी तिरंगी, चौरंगी लढत होईल असे वर्तवण्यात येत आहे. एकूणच केज शहरातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले असून वार्डा वार्डात नुसत्याच निवडणुकीच्या चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!