Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमाझ्या प्रेमाच्या माणसांसाठी मी सदैव प्रयत्नशील -आ. क्षीरसागर

माझ्या प्रेमाच्या माणसांसाठी मी सदैव प्रयत्नशील -आ. क्षीरसागर


शिरापूर धुमाळ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

बीड (रिपोर्टर)- नवगण राजुरीप्रमाणे शिरापूर येथील ग्रामस्थांनी काकु-नाना पासून दादांवर व माझ्यावर नेहमी प्रेम आशीर्वाद दिले. या प्रेमाची आणि आशीर्वादाची उतराई होऊ शकत नाही, परंतु गावच्या विकासासाठी व माझ्या प्रेमाच्या माणसांसाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे म्हणत आ. संदीप क्षीरसागर यांनी आज रायमोहा जिल्हा परिषद गटातील शिरापूर धुमाळ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला.


बीड विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज सकाळी रायमोहा जिल्हा परिषद गटातील शिरापूर धुमाळ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. आ. क्षीरसागरांनी मतदारसंघातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे आणले आहेत. त्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात ठिकठिकाणी होत असून आ. क्षीरसागरांच्या हस्ते या कामाचे शुभारंभ केले जात आहे. शिरापूर धुमाळ येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या विकास काम शुभारंभ प्रसंगी आ. क्षीरसागरांनी काकु-नानांपासून दादांवर व माझ्यावर या गावच्या लोकांनी प्रेम व आशीर्वाद कायम ठेवले आहेत. त्यांचे प्रेम आशीर्वाद याची उतराई करणे शक्य नाही. परंतु त्या गावचा विकास करणे हे माझे उद्दिष्ट असल्याचे सांगत माझ्या प्रेमाच्या माणसांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!