Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडपरळीनिर्घृणपणे गळा चिरुन तरुणाची हत्या पाय बांधून मृतदेह फेकला तलावात

निर्घृणपणे गळा चिरुन तरुणाची हत्या पाय बांधून मृतदेह फेकला तलावात


बीड /सिरसाळा: (रिपोर्टर)-परळी तालुक्यातील वांगी शिवारातील तलावात अनोळखी तरुणाचा मृतदेह 1 डिसेंबर रोजी आढळून आला होता. दरम्यान, धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पाय दोरीने बांधून मृतदेह तलावात फेकण्यात आला होता. 2 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता अज्ञात आरोपीवर सिरसाळा ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. हत्येचे गूढ कायम आहे.


1 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता वांगी (ता.परळी) येथील तलावाच्या किनार्‍यास सिरसाळा- बीड रस्त्याच्या उत्तरेस काही गुराख्यांना एक मृतदेह तलावाच्या आढळला. नानकराम रावत (27,रा.घोडीबुजूला, मध्यप्रदेश, हमु.सिरसाळा) या गुराख्याने याची माहिती तातडीने सिरसाळा पोलिसांना कळवली. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात त्याचा खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. पो.ना.तुषार गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात मारेकर्‍यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे तपास करत आहेत.

मृताची ओळख पटविणे सुरु
मृताचे वय अंदाजे 35 ते 40 असून त्याची ओळख पटलेली नाही. तीन ते चार दिवसांपासून मृतदेह पाण्यात असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती. पँटच्या खिशाच्या आतील बाजूस पेनाने संतोष असे लिहिलेले आढळले. त्याच्या डाव्या कानाजवळ धारदार शस्त्राने वार केलेला असून गळा चिरलेला आहे. दोन्ही पाय घोट्याजवळ दोरीने बांधलेले आहेत. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु असून खुनामागचे कारण गुलदस्त्यात असल्याचे सहायक निरीक्षक प्रदीप एकशिेंगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!