Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमशिक्षकाच्या घरात ठेवलेले बत्तीस तोळे सोने लंपास

शिक्षकाच्या घरात ठेवलेले बत्तीस तोळे सोने लंपास


केज (रिपोर्टर):
दिवाण पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेले बत्तीस तोळे सोने अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना केज तालुक्यातील नांदूरघाट येथे घडली असून या प्रकरणी काल केज पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.

विकास किसनराव ढाकणे रा. नांदूरघाट ता.केज या शिक्षकाच्या पत्नीने 32 तोळे सोने हे त्यांच्या घरातील हॉलमधील दिवाणाच्या बॉक्समध्ये दि.15 नोव्हेंबर रोजी ठेवले होते. ते ठेवलेले सोने त्यांनी 29 नोव्हेंबर तपासले असता त्यांना ते मिळून आले नाही. त्यामुळे 15 ते 29 नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांचे 15 लाखाचे सोने लंपास केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!