Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकाझीनगरमधील रस्त्याने पायी चालता येईना रस्त्यावर खड्डेच खड्डे अन् चिखल

काझीनगरमधील रस्त्याने पायी चालता येईना रस्त्यावर खड्डेच खड्डे अन् चिखल


न.प.ने बाजुच्या गल्लीत रस्ता केला, काझीनगरमध्ये का नाही?

बीड (रिपोर्टर):- बीड शहरातील अनेक प्रभागातील रस्ते अत्यंत खराब आहेत. या खराब रस्त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना रस्त्याने पायी चालणे मुश्किल होत आहे. जालना रोडलगत असलेल्या काझीनगर येथील रस्त्याचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तो प्रश्‍न अद्यापही नगर पालिकेने सोडवला नाही. गेल्या दोन-तीन दिवसापासून पाऊस पडत असल्याने या पावसामुळे रस्त्याने पायी चालता येत नाही. जागोजागी खड्डे आणि पाणी जमा झाले. काझी नगरच्या बाजुच्या गल्लीत नगर पालिकेने सिमेंट रस्ता केला मात्र या भागात रस्ता केला नाही. नगर पालिका विकास कामाबाबत दुजाभाव का करते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला असल्याचे नेहमीच सांगितले जाते. मात्र शहरातील अनेक प्रभागात साधे व्यवस्थित रस्ते नसल्याने नागरिकांना रस्त्याअभावी विविध अडचणीला तोंड द्यावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात बेहाल होतात. जालना रोडलगत असलेल्या काझी नगरच्या रस्त्याचा प्रश्‍न काही वर्षापासून प्रलंबित आहे. या भागामध्ये नागरिकांची नेहमी ये-जा असते. टोलेजंग घरे या परिसरामध्ये बांधण्यात आलेली आहेत. मात्र व्यवस्थित रस्ताच नसल्याने नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे या रस्त्याच्या बाजुच्या गल्लीत रस्ता झाला मात्र काझीनगरचा रस्ता करण्यात आला नसल्याने नगर पालिका प्रशासन विकास कामात दुजाभाव करत आहे की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


लोकप्रतिनिधी काय करतात?

लोकप्रतिनिधी नेहमीच विकासाच्या बाता मारत असतात. मात्र प्रत्यक्षात जेंव्हा विकास करण्याची वेळ येते तेंव्हा काहीच केले जात नाही. काझीनगर भागातील रस्त्याबाबत या परिसरातील लोकप्रतिनिधी कुठलीच भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. निवडणूकीत लोकांन अमिष दाखवायची आणि निवडून आल्यानंतर पाठ दाखवण्याचे काम पुढारी आजपर्यंत करत आले आहेत. या भागातील नगरसेवकांनी रस्त्याचा पाठपुरावा का केला नाही? या रस्त्याचे उद्घाटन अनेक वेळा झाले, उद्घाटन होईनही रस्ता नगर पालिकेने का केला नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रस्त्याबाबत राजकारण तर होत नाही ना?

Most Popular

error: Content is protected !!