Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


बीड (रिपोर्टर) ‘सागरा..सागरा… शांत हो जरा, भीम माझा येथे निजला’ भारतीय घटनेचे शिल्पकार, देशातील अठरापगड जातीला आपल्या संविधानाद्वारे माणसाला माणूसपण मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांच्या पुतळ्याला कोरोनाचे नियम पाळत हजारो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महानिर्वाण दिन आहे. जगात प्रकांड पंडित म्हणून डॉ. बाबासाहेबांची ओळख आहे. सर्वात मोठे असे संविधान लिहून त्यांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून दिला. ज्यांना त्यांचे माणूसपण हिरावले होते त्यांचे हक्क संविधानात त्यांनी अधोरेखित केले. आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समता सैनिक दल यांनी कोरोनाचे नियम पाळत शहरातून रॅली काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे विसर्जन केले आणि या सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. भंतेजी यांनी या वेळी त्रिशरण बौद्ध वंदना उपस्थितांना दिली. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, सर्व पक्षांचे राजकीय नेते, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते. रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांनीही या वेळी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. महिला बौद्ध महासभेच्या वतीनेही या वेळी पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली.

Most Popular

error: Content is protected !!