Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीड‘अमर रहे.. अमर रहे अविनाश आंधळे अमर रहे’ हिंगणी बुद्रुकच्या अविनाशला अखेरचा...

‘अमर रहे.. अमर रहे अविनाश आंधळे अमर रहे’ हिंगणी बुद्रुकच्या अविनाशला अखेरचा सलाम


शासकीय इतमामात अंत्यविधी, अंत्यविधीसाठी पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती, रस्त्यावर रांगोळी, टाळमृदंगाचा गजर, विद्यार्थ्यांच्या सलामीने उपस्थित गहिवरले

बीड (रिपोर्टर)- जय जवान जय किसानचा नारा देणार्‍या भारत देशात शेतकरी पुत्र अविनाश कल्याण आंधळे हा जवान दिल्लीत परवा शहीद झाला. त्याच्या पार्थीवदेहावर हिंगणी (बु.) येथे आज सकाळी मोठ्या शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीदाच्या अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी उपस्थिती दर्शविली होती. ‘जय जवान जय किसान’च्या नार्‍याबरोबर ‘अमर रहे अमर रहे, अविनाश आंधळे अमर रहे’ च्या घोषणांनी आस्मंत दुमदुमून गेले.

corona


बीड तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील कल्याण आंधळे या सर्वसामान्य शेतकर्‍याचा पुत्र वीर जवान अविनाश कल्याण आंधळे हा गेल्या सहा वर्षांपुर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाला होता. परवा दिल्लीस्थित कर्तव्यावर असताना अविनाश यास वीरगती प्राप्त झाली. आज सकाळी अविनाशचा पार्थीव हिंगणी (बु.) येथे आणण्यात आला. अंत्यदर्शनानंतर अविनाश याची अंत्ययात्रा निघाली. अमर रहे अमर रहे अविनाश आंधळे अमर रहे, ‘जय जवान जय किसान’चे नारे साश्रू नयनांनी देत अविनाशच्या पार्थीवदेहावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाशच्या अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी उपस्थिती दर्शविली होती.

Untitled 1 copy 1

या वेळी आ. संदीप क्षीरसागरांनी वीर जवान आंधळे हे अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. जय जवान जय किसान हा नारा जो भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता हा नारा आपल्या कर्तृत्ववान जीवन शैली द्वारे शहीद अविनाश आंधळे यांनी करून दाखविला, अशी भावपुर्ण आदरांजली वाहिली. अविनाशची अंत्ययात्रा ज्या रस्त्याने जात होती त्या रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अविनाशला अखेरची सलामी दिली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!