Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडन्यायालयीन कोठडीतील संदीपच्या सुटकेसाठी टाक कुटुंबियाचे उपोषण

न्यायालयीन कोठडीतील संदीपच्या सुटकेसाठी टाक कुटुंबियाचे उपोषण


बीड (रिपोर्टर) बीड शहरातील कृष्ण मंदिर भागात असलेल्या एका विहिरीमध्ये दोन महिन्यांपुर्वी मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला होता. सदरील दोन तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती.

या प्रकरणी बीड शहर, शिवाजीनगर आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हेही दाखल होते मात्र असे असतानाही या प्रकरणात संदीप जयसिंग टाक याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याची रवानगी न्यायालयाकरवी न्यायालयीन कोठडीत केली आहे. टाक याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून त्याची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी काही शिवसेना पदाधिकारी आणि त्याच्या कुटुंबिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!