Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedमांजरसुंब्यावर शेतकर्‍यांचा बैलगाडीसह चक्काजाम वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर

मांजरसुंब्यावर शेतकर्‍यांचा बैलगाडीसह चक्काजाम वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर


नेकनूर (रिपोर्टर) वीज वितरण कंपनीकडून सक्तीने विजेची वसुली सुरू आहे. याच्या निषेधार्थ आज मांजरसुंबा येथे शेतकर्‍यांनी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या आंदोलनात मांजरसुंबा परिसरातील शेतकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हे आंदोलन रमेश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली झाले.

263739000 638798213958556 4082203980989060135 n

वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांना वेठीस धरण्याच्या उद्देशाने विज कनेक्शन तोडणे सुरू केले आहे. कनेक्शन तोडल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या पिकाला पाणी देता येत नाही. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. कंपनीने आपली दंडेलशाही थांबवावी. शेतकर्‍यांचे विजेचे कनेक्शन पुर्ववत जोडून द्यावे यासह इतर मागण्यांसाठी आज मांजरसुंबा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. शेतकरी बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलन रमेश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी स्वप्नील गलधरसह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!