Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमसुरळेगावात अवैध वाळूचे दोन हायवांसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

सुरळेगावात अवैध वाळूचे दोन हायवांसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त


गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील गोदापत्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या दोन हायवा वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे तहसीलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. त. प्रशांत जाधवर यांच्यासह पथकाने आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास केली आहे.


दरम्यान तहसीलदार सचिन खाडे हे गेवराई तहसिल कार्यालयाला रुजू झाल्यापासून त्यांनी अवैध वाळू वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाया सुरू केल्याने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. राक्षसभुवन, सुरळेगाव येथे तर अवैध वाळू माफिया मोठ्या प्रमाणात उपसा करून चोरटी वाहतूक करत असून याबाबत महसूल प्रशासनाकडून वारंवार कारवाई होत आहे. मागील आठवड्यातच सुरळेगाव याठिकाणाहून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह त्याठिकाणी छापा टाकून एक हायवा व दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. दरम्यान या कारवाईला आठ दिवस उलटत नाही तोच आज पहाटे पुन्हा याठिकाणी तहसीलदार सचिन खाडे यांनी नेमलेल्या पथकाने छापा टाकून अवैधरित्या वाळू भरुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे दोन हायवा पकडले आहेत. दोन्ही हायवासह त्यामध्ये प्रत्येकी तीन ब्रास वाळू असा जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पकडलेले दोन्ही हायवा येथील तहसील कार्यालयात लावण्यात आली आहेत. हि कारवाई तहसीलदार सचिन खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. त. जाधवर, अव्वल कारकुन नामदेव खेडकर, मंडळ अधिकारी परमेश्वर सानप , मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ , मंडळ अधिकारी खेडकर, तलाठी ठाकुर, सुरावार, ढाकणे, आदींनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!