Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपत्नीसह मुलगी बेपत्ता, नेकनूर ठाण्यात तक्रार

पत्नीसह मुलगी बेपत्ता, नेकनूर ठाण्यात तक्रार


बीड (रिपोर्टर) काहीही कारण न सांगता 27 वर्षीय पत्नी तीन वर्षाच्या मुलीला घेऊन घरातून निघून गेली. तिचा नातेवाईकांसह इतरत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने पतीने नेकनूर पोलिसात पत्नी व मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली असून त्या दोघी कुठे आढळल्या तर नेकनूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


रेखा अशोक घोडके (रा. सफेपूर ता. जि. बीड) ही आपली मुलगी माही अशोक घोडके (वय 13) हिला सोबत घेऊन 7 डिसेंबर रोजी घरातून निघून गेली. तिचा पती अशोक घोडके याने सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने नेकनूर पोलिसांत तक्रार दिली. त्या दोघींचा नेकनूर पोलिस तपास करीत असून कोणाला त्या मिळून आल्या तर नेकनूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाण्याचे परमेश्वर सानप (9923071106) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केेले आहे.

Most Popular

error: Content is protected !!