Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमआयसीआयच्या एटीएममधून निघाली बनावट पाचशेची नोट

आयसीआयच्या एटीएममधून निघाली बनावट पाचशेची नोट


बीड (रिपोर्टर):- आयसीआय बँकेच्या एटीएममधून एका खातेदाराने पैसे काढले होते. सदरील खातेदारास पाचशे रूपयाची एक नोट बनावट आली असून या प्रकरणी खातेदाराने बँकेकडे तक्रार केली. एटीएममधून बनावट नोट निघाली कशी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गणेश सुरेशराव साळुंके यांनी दि.27 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजुन 22 मिनिटांनी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढले होते. या पैशामध्ये त्यांना एक पाचशे रूपयांची बनावट नोट आली. जिचा क्रमांक 5 पीबी 417784 असा आहे. याबाबत साळुंके यांनी बँकेकडे तक्रार दाखल केली आहे. एटीएममधून चक्क पाचशे रूपयाची बनावट नोट आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जावू लागले असून सदरील हा प्रकार घडला कसा? असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!