Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशिरूरवैयक्तिक टीका करणार्‍यांना कोर्टात खेचणार -आ.धस शिरूरमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटले

वैयक्तिक टीका करणार्‍यांना कोर्टात खेचणार -आ.धस शिरूरमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटले


शिरूर (रिपोर्टर) तुम्ही आमच्या रंगावर बोलायला लागले, व्यक्तीगत टीका करण्यापेक्षा विकासावर बोला, आम्ही चालू केलेल्या कामाला ज्यांनी स्टे दिला तेच काल नारळ फोडायला आले. नगरविकास मंत्र्याचं काय हे दुर्दैव. सव्वादोन कोटींचं काम तुम्ही थांबवलं, दशक्रिया विधी घाटाचं काम तुम्हीच थांबवलं, मग विकासाला कोणी खोडा घातला? असा सवाल करत आ. सुरेश धसांनी सत्ताधारी व राष्ट्रवादी आमदारावर हल्लाबोल चढवला.

ते शिरूर नगरपंचायत निवडणुक भाजपाच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाग्यश्री ढाकणे, दशरथ वनवे, शिवाजी पवार, रोहीदास पाटील, प्रकाश देसर्डा, आश्रुबा खरमाटे, कल्याण तांबे, प्रकाश खेडकर, शकुंतला ढाकणे, फय्याज शेख, प्रकाश बडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. काल राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आज भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ कालिकादेवी व सिद्धेश्‍वर चरणी नारळ चढवून झाला. या वेळी बोलताना आ. सुरेश धसांनी सरकारवर हल्लाबोल करत राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हे कपट कारस्थानी आणि मोडामोडी करून जोडाजोडीने आलेलं सरकार असल्याचं म्हटलं. एसटीचा संप चालू आहे, एकतरी नेता त्यांना भेटला का? केवळ विषय डायव्हर्ट करण्याचं काम हे सरकार करत आहे. विकास कामांवर बोलण्यापेक्षा काल त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली. वैयक्तिक टीका करणार्‍यांना कोर्टात खेचणार असल्याचे सांगून आम्ही जेवढे विकास कामे आणले त्यात विरोधकांनी खोडा घातला. विरोधकांनी थांबवलेल्या कामाचे फ्लेक्स वार्डा वार्डात लावा म्हणजे जनतेला कळेल हे पाप कोणाचे? आम्ही कोविड काळात किती कोव्हीड सेंटर चालविले, तुम्ही काय केले ते सांगा, दोन वर्षात एकतरी रस्ता केला का? आडवाआडवी आणि जिरवाजिरवी हेच या सरकारच्या काळात चालू आहे. चार्जशीट दाखल झालं, त्यात आमचं नाव नाही, मग आम्ही कुठं हजार कोटींचा घोटाळा केला? राजकारणात सामान्य माणसाने राहायला नको असं विरोधकांना वाटतं, त्यामुळे शहराच्या विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी या वेळी केलं.

Most Popular

error: Content is protected !!