Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमगिताजंली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय,कर्ज फेडू शकत नाही म्हणत… मोबाईलवर लेकीला बोलून...

गिताजंली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय,कर्ज फेडू शकत नाही म्हणत… मोबाईलवर लेकीला बोलून शेतकर्‍याने घेतली फाशी


वडवणी (रिपोर्टर):- गिताजंली तुझा बाप कर्जबाजारी झालाय,घेतलेले कर्जफेडू शकत नसल्याने जिवन असहाय्य झाले आहे… शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतोय…लवकर मातीला ये…असं सासरी असणाऱ्या लेकीला मोबाईलवर संभाषण करुन कर्जबाजारीपणाला कंटाळून 42 वर्षीय शेतकऱ्यानी बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असून या घटनेन चिंचोटी परिसरात खळबळ उडाली आहे.

बालासाहेब लक्ष्मण गोंडे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच नाव असून चिंचोटी येथील ते रहिवाशी आहेत.त्याचं पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे अंदाजे दिड एकर शेती आहे.रात्री 9 वा.घरातील मंडळीना शेतात चाललो आहे.गोठ्यावरच झोपणार आहे.असं म्हणून शेतात गेले आज सकाळी सहा वा. नादलगांव येथे दिलेल्या मुलीला मोबाईलवरुन बोलले आणि म्हणाले कि,गिताजंली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे,घेतलेले कर्ज फेडू शकत नाही,शेतातील पिक देखील यंदा आले नाही संपूर्ण पिक वाया गेले आहे.यामूळे मी खूप खचून गेलो आहे.आता तू सासर घरुन लवकर निघ,मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे.असं म्हणताच मोबाईल वरील संभाषण कट झाले.तितक्याच गिताजंली या मुलीने चुलत भाऊ असणाऱ्या कालीदास रामकिसन गोंडे यांना फोन करुन बापाने सांगितलेली हाकीकत सांगितली आणि तुम्ही लवकर शेतात जा अन्यथा अनर्थ घडू शकतो असं सांगितल्या बरोबर कालीदास गोंडे यांनी काही अंतरावर असलेला पुतण्या युवराज दिलीप गोंडे याला फोन करुन बालासाहेब गोंडे यांच्या शेतात जा,तो आत्महत्या करत आहेत असं म्हणत मुलीला फोनवर बोलला आहे,तु लवकर जा…आणि आम्हाला फोन करुन सांगा,तितक्याच लवकर युवराज गोंडे यांनी धाव घेतली परंतु बालासाहेब लक्ष्मणन गोंडे या शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आणि यांची कुंटुबियांना माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली असून हि घटना मानवी जिवनाला चटके देणारी ठरली आहे. या घटनास्थळी जावून वडवणी पोलीसांनी पंचनामा केला आहे.तर श्वविच्छेदन करण्यासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी याठिकाणी आणण्यात आला असून मयत शेतकरी बालासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील, अविवाहित एक मुलगी व दोन विवाहित मुलीसह 10 वर्षाचा एकुलता एक मुलगा आहे असे सांगण्यात येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!