बीड (रिपोर्टर): बीड पंचायत समिती अंतर्गत रोहयोतून वैयक्तिक योजना तात्काळ सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी आज काही शेतकरी सरपंच, उपसरपंच यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.
बीड पंचायत समिती अंतर्गत रोहयोच्या वैयक्तिक योजना काही दिवसांपासून बंद आहे त्यामुळे शेतकर्यांचे फळबाग, सिंचन विहिरी, शेत तलावाचे पैसे थकलेले आहेत. सदरील लाभार्थ्यांचे मस्टर सुरू करून त्यांचे पैसे उपलब्ध करून द्यावेत त्यासाठी आज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. हे आंदोलन धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
लाभार्थ्यांनी तात्काळ मागण्या द्याव्यात -बीडीओ सोळंके
आंदोलनकर्त्यांनी बीडीओ सोळंके यांच्याशी चर्चा केली. या वेळी सोळंके म्हणाले की, संबंधितांनी मस्टर काढण्याबाबतच्या मागण्या तात्काळ संबंधित विभागाकडे देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मागण्या निघालेल्या नाहीत त्यामुळे कित्येक शेतकर्यांचे पैसे रखडून पडले. सोळंके यांनी तात्काल पुढाकार घेऊन मागण्या काढल्या तर नक्कीच फळ उत्पादक शेतकर्यांना व इतरांना त्याचा लाभ मिळू शकतो व शेतकर्यांना त्यांचे पैसे मिळू शकतात.











