बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना करत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तात्काळ करा व देशभरात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता पुढील निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ दुष्काळी उपाययोजना करण्यात याव्यात त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या नुकसाणीचे पंचनामे करण्यात यावेत या प्रमुख मागणीसह देशभरात ईव्हीएम मशीनद्वारे जे मतदान होत आहे ते फसवे असून त्यातून मतदारांची फसवणूक केली जाते. भारतीय जनता पार्टी ईव्हीएममध्ये छेडछाड करून स्वत:चे उमेदवार निवडून आणतात, त्यामुळे यापुढे होणार्या प्रत्येक निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना देण्यात आले.या वेळी शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख माजी आ. सुनील धांडे, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, रत्नाकर शिंदे, महिला आघाडीच्या संगीता चव्हाण, जिल्हा समन्वयक भाई संजय महाद्वार, नितीन धांडे, हनुमंत जगताप, सुशील पिंगळे, रतन गुजर, गोरख शिंघण, शेख निजाम, मसरू पठाण, बालासाहेब शेप, शेख फरजाना, अशोक जाधव, रमेश नवले, बाळासाहेब कुटे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.











