तुका म्हणे पतिव्रता । तिची देवावरी सत्ता
सिंदळ
सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 30 जुलै रोजी चे कटाक्ष
तुका म्हणे पतिव्रता । तिची देवावरी सत्ता
सिंदळ
गणेश सावंत/9422742810
अखंड हिंदुस्तानचेच नव्हेतर विश्वाचे अस्तित्व हे स्त्रियत्वाच्या मुळाशी उगमस्त आहे. कधीकाळी स्त्रियांकडे दुबळे म्हणून पाहिले जायचं. परंतु राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचा जाज्वल्य इतिहास स्त्रियांचा आणि त्यांच्या आदीशक्तीचा महिमा सांगून टाकते. न्याय, निती, संस्कृती, संस्कार, पालनपोषण, संगोपन हे जिथून मिळते त्या स्त्रीमध्ये देवी म्हणून पाहिलं जातं. मात्र गत काही कालखंडापासून सौराचाराचा अड्डा म्हणून ज्या राजकारणाकडे पाहिलं जातं त्या अड्ड्याच्या पाईक बनलेल्या काही महिला सिंदळ स्वरुप उभ्या विश्वाला दाखवण्याचा प्रयास करत बुद्धीजिवींच्या लाईनीतले आपण आहोत, हे दाखवण्याचा प्रयास करतात. भारतीय जनता पार्टीच्या खासदार असलेल्या सिनेअभिनेत्री कंगना राणावत या त्यापैकी एक. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडात कंगना राणावत यांनी ज्या ज्या विषयांना हात घालण्याचा प्रयत्न केला त्या त्या विषयात कंगना राणावत यांचं थोबाड फुटल्याचे अनेक वेळा पहायला मिळाले. काल-परवा दिल्लीच्या जंतरमंतरवर अखंड देशातील तरुण-तरुणाईचं एक न्यायिक आंदोलन झालं. त्या आंदोलनाचा परिणाम केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा दिल्यानंतर दिसून आला. मात्र त्यावर कंगना राणावत यांनी या आंदोलनाला गटार जनरेशन असे संबोधून वाद ओढून घेतला. महिलांबाबत कंगना राणावत यांचे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये पहायला मिळाले.

‘शाहीन बाग की बिल्कीस’
दिल्लीत शेतकर्यांचं आंदोलन उभा होतं, न्याय-हक्कासाठी लहान-मोठे, वृद्ध, शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी एक सत्तर वर्षाची वृद्ध शेतकरी महिला महिंदर कौर याही आंदोलनामध्ये सहभागी होत्या. संबंधित शेतकरी महिलेचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत कंगना हिने ‘शाहीन बाग की बिल्कीस दादी’ असं म्हणत शंभर रुपयावर ही म्हातारी आंदोलनासाठी उपलब्ध असते, अशी पोस्ट केली. या प्रकरणाने प्रचंड वादंग निर्माण झाले. महिंदर कौर या कोर्टात गेल्या. अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला तेव्हा कंगनाला जाहीर माफी मागावी लागली. याच प्रकरणात सीआयएसएफच्या महिला कर्मचार्याने विमानतळावर कंगना हिच्या कानफटात मारली. कंगनाचे असे एक वक्तव्य नाही, महिलांच्या बाबतीत आणि त्यांच्या चारित्र्यावर सातत्याने कंगनाने शिंतोडे उडवले. कुठे कंगना
सेक्सलॉईज प्रोफेशन
म्हणत नर्ससारख्या अनन्यसाधारण महत्व असलेल्या सेवेला आणि त्यांच्या कार्याला सेक्सलाईज प्रोफेशन म्हणून याच कंगना बाईने गेल्या काही महिन्यांपूर्वी हिणवले. ज्या महिला आरोग्य सेवा देतात. ज्यांच्याकडे दाई म्हणून पाहिलं जातं, ज्यांची सिस्टर म्हणून ओळख आहे त्यांच्याबाबत कंगनाने वक्तव्य करून आपल्या वक्तव्यातील सिंदळपणाचा देखावा उभ्या जगाला दाखवून टाकला. ही बाई एवढ्यावर थांबली नाही, या देशामध्ये पॉर्नस्टार सनी लिओनी यांना (हे तिचं वाक्य) सर्वाधिक इज्जत मिळत असल्याचा दावा कंगनाने केला होता. हे महिलांबाबतचे वादग्रस्त विधान पाहिले तर ‘गटार जनरेशन’ ही राणावतच्या कंगनापुरती मर्यादीत म्हणावी का? कंगना जेव्हा-केव्हा तोंड उघडते तेव्हा कुठलीही माहिती नसताना ओकारी करते आणि त्यातून दुर्गंधी बाहेर फेकते. महिलांबाबतचे वक्तव्ये आणि देशाबाबतचे वक्तव्ये पाहिल्यानंतर
कंगनाचे स्वातंत्र्य
बहुदा तिला खासदारकी मिळाल्यानंतर मिळाले असावे. कंगना म्हणते, हा देश मोगलांचा गुलाम होता, इंग्रजांचा गुलाम होता, काँग्रेसचे शासन हे कुशासन होते मात्र खरे स्वातंत्र्य हे 2014 नंतर मिळाले. त्याआधी कंगनाने आणखी एक वक्तव्य केलं. सरदार पटेलांना इंग्रजी येत नव्हती म्हणून ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. कंगनाचे आजपर्यंतचे वक्तव्य हे सातत्याने वादग्रस्त ठरले. अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक ट्विट कंगनाने केले. भाजपाचे जे.पी. नड्डा यांना ते काढावे लागले. ट्विटरने कंगनाचे ट्विटर हँडल बंद केले. अपमानजनक व्यवहार केला जातो, म्हणून ट्विटर हँडल बंद केल्याचे त्यावेळी ट्विटरने सांगितले. हा सर्व वक्तव्यातील सिंधळपणा व्यक्त होण्याचे आणि त्या सिंधळपणावर कटाक्ष टाकण्याचे कारण एवढेच,
इथे आवाज उठलाय ,
तरुणाई जागी झालीय. ती सरकारला प्रश्न विचारतेय, सुर्य आणि जयद्रथ दाखवण्याचा हट्ट धरतेय, बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल म्हणतेय आणि भारतीय संविधानाने या तरुणाईला तो अधिकार दिलाय. नक्कीच आंदोलनकर्त्या तरुणांमधील काहींची भाषा ही चुकीची असू शकते परंतु ती भाषा उत्पन्न करणारे कारण अधिक महत्वाचे. सरकारला जर तरुणाईच्या भाषेत कटुता वाटत असेल तर सरकारने तरुणाईंचे ते प्रश्न संपुष्टात आणायला हवेत, मात्र सरकारमधील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जंतरमंतरवर आलेल्या तरुणींना सामूहिक बलात्कार आवडतो, अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते तेव्हा त्या काही तरुणांच्या भाषेत आणि कंगनापासून त्या भाजपाच्या नेत्याच्या वक्तव्यापर्यंत फरक तो काय? आज या देशातला तरुण उठलाय, तो उद्या उभा राहील. प्रश्न सुटले नाहीत तर तो पळत पळत जावून त्याला हवा तो झेंडा संसदेवर लावेल हे त्रिवार सत्य नाकारता येणार नाही. प्रश्न कंगना आणि तिच्या भाषिक सिंधळपणाचा. तर भाजपाने स्वत:ला अभ्यासू आणि संस्कारशील ज्या पद्धतीने म्हणवून घेतलं जातं त्या पद्धतीने कंगनासारख्या बुद्धीहीन खासदाराला संस्कार, संस्कृती, महिलांच्या बाबत आदर हा शिकवला तर अधिक बरे.








