परळी (रिपोर्टर): लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर राज्यभरातील अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत समाधीचे दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली, या वेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे या भजनात दंगून गेल्या होत्या. उपस्थितांना पंकजा मुंडे या दुपारनंतर मार्गदर्शन करणार आहेत.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर राज्यभरातील अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. आज सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह अन्य कार्यक्रमांची रेलचेल गोपीनाथ गडावर पहावयास मिळाली. सकाळी वैद्यनाथाचे दर्शन घेऊन माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. प्रितम मुंडे या गोपीनाथ गडावर दाखल झाल्या. त्याठिकाणी त्यांनी स्व. मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेत आदरांजली वाहिली.