Friday, January 28, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबई‘आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या’ २०० एसटी कर्मचार्‍यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या’ २०० एसटी कर्मचार्‍यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई (रिपोर्टर) एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर बीड आगारातील जवळपास दोनशे एसटी कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. बीड आगारामध्ये मागील ५४ दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. संपाला ५४ दिवस उलटून देखील, अद्यापही विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सेवेसाठी सद्यस्थितीत कर्मचार्‍यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही, असं कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

राज्यातील इतर शासकीय कर्मचार्‍यांच्या तुलनेत एसटी कर्मचार्‍यांची आर्थिक स्थिती वाईट असताना देखील राज्य सरकार याबाबत विचार करत नाहीये. राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येऊन आम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्त करावे, असं बीड आगारामधील कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे. आतापर्यंत जवळपास २०० हून अधिक कर्मचार्‍यांनी या पत्रावर सह्या करून जिल्हाधिकार्‍यांमार्फत हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!