Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedपोर्णिमा जिनिंगमध्ये जबरी चोरी; ४७ लाख पळवले

पोर्णिमा जिनिंगमध्ये जबरी चोरी; ४७ लाख पळवले


सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

बीड | रिपोर्टर
शेतकर्‍यांचे पेमेंट करण्यासाठी तिजोरीत ठेवलेले ४७ लाख रूपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही चोरीची घटना काल कवडगाव घोडा येथील पोर्णिमा कॉटन जिनिंगमध्ये घडली. या प्रकरणी जिनिंग मालकाने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


ओमकार उत्तमराव खुुरपे रा.माजलगाव यांची परळी तालुक्यातील कवडगाव घोडा येथे पौर्णिमा कॉटन जिनिंग आहे. या जिनिंगमध्ये कापसाची खरेदी केली जाते. २४ डिसेंबर रोजी शेतकर्‍यांचे पेमेंट करण्यासाठी बँकेतून ५० लाख रूपये आणण्यात आले होते. यातील काही रक्कम वाटप करून ४५ लाख रूपये एका तिजोरीमध्ये आणि २ लाख ७४ हजार ४०० एका तिजोरीमध्ये ठेवण्यात आले होते. काल रात्री तिजोरी उघडून अज्ञात चोरट्याने दोन्ही तिजोरीतील ४७ लाख रूपये चोरून नेल्याचे उघडकीस आले. तिजोरीतील पैसे गायब झाल्याची माहिती जिनिंगचे कॅशीअर अशोक साळुंके यांनी ओमकार खुरपे यांना दिली. रात्रीच्या दरम्यान जिनिंगमध्ये अशोक साळुंके आणि ब्रेडर कारभारी हारकळ हे झोपी गेले होते. तिजोरीच्या चाव्या अशोक साळुंके यांच्या उशाखाली होत्या. चाव्या घेवून तिजोरी उघडून आतील ४७ लाख रूपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी ओंकार खुरपे यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा अधिक तपास सिरसाळा पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!