बीड (रिपोर्टर): सरपंच, उपसरपंच, ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू असून पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता, सरपंच, उपसरपंच यांचे थकीत मानधन तात्काळ अदा करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, ऑपरेटर बेमुदत संपावर गेले असून तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामरोजगारसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.