बीड, (रिपोर्टर)ः- जिजाऊ मल्टीस्टेट,साईराम, ज्ञानराधा या बॅकेमध्ये ठेवीदारांचे कोट्यावधी रूपये आडकून पडले आहेत. ठेवीदारांने त्यांचे पैसे तात्काळ द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
बीड शहरातील ज्ञानराधा, साईराम, जिजाऊ, मातोश्री, राजस्थानी, मराठवाडा अर्बन (माजलगाव) या मल्टीस्टेट मध्ये कोट्यावधी रूपये आडकून पडले. ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार अडचणीत सापडले. संबंधित बॅकेकडून पैसा बाबत टोलवा टोलवी केली जात आहे. बॅकेच्या संचालक मंडळाच्या मालमत्तेची चौकशी करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी व ठेवीदारांचे पैसे तात्काळ द्यावेत यासह इतर मागण्यांसाठी आज स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.











