Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडएसपीच्या पथकाने वाळूचा टिप्पर पकडला

एसपीच्या पथकाने वाळूचा टिप्पर पकडला


बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात अनाधिकृतपणे वाळूची तस्करी सुरूच आहे. आज एसपीच्या पथकाने वाळूने भरून चाललेला टिप्पर पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केला. वाळू घेवून जात असलेला टिप्पर एसपीच्या पथकाला निदर्शनास आल्यानंतर सदरील पथकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतला.

सदरील ही कारवाई पथक प्रमुख एपीआय धोक्रट, पोलिस कर्मचारी शेख अनवर, गोविंद काळे, दुर्राणी, सचिन पाटेकर यांनी केली. सदरील हा टिप्पर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!