बीड, (रिपोर्टर)ः- मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासुन मी शिवसेनेमध्ये काम करत आहे. माझ्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करण्यात आला. सुष्मा अंधारे यांनी निष्ठावंताचे पंख छाटल्याचा आरोप करत आज समर्थकांसह आपण शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे अनिल जगताप यांनी बीड येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.
अनिल जगताप यंाच्या समवेत शेकडो कार्यकर्ते आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. संध्याकाळी त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. गेल्या काही दिवसापुर्वीच अनिल जगताप यानी उभाठा सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज मुंबई येथे जगताप वर्षा निवासस्थानी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आज सकाळी अनिल जगतापसह त्याचे शेकडो समर्थक मुंबईकडे रवाना झाले. बीड येथे माध्यमांशी बोलतांना जगताप म्हणाले की मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासुन मी शिवसेनेमध्ये काम करत आहे. माझ्या सारख्या निष्ठावंतावर अन्याय झाला आहे. पक्षात नवीन आलेल्या अंधारे सारख्यांनी माझे पंख छाटन्याचे काम केल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. तरूणापासुन ते वयोवृध्द आपल्या समवेत असुन जवळपास 500 गाड्यांचा ताफा असल्याचे जगताप यांनी म्हंटले आहे.











