परळी (रिपोर्टर): दोन गटातील वाद रात्री अचानक उफाळून आल्याने दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने शहरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटातील 30 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. या 30 पैकी 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक यांना झाल्यानंतर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी परळीला भेट दिली. सध्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिडकेंसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत.
परळी शहरातील बागवान व इतर अन्य एका गटामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. सदरील हा वाद रात्री पुन्हा उफाळून आला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने मोैां रोह परिसरामध्ये एकच पळापळ सुरू झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन दहा ते बारा जणांना अटक केली. घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री परळी शहरात भेट दिली. या प्रकरणी पोलीस अंमलदार विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून शेख बाबा, सय्यद साजेद बबलू, शेख सफर, एजाज सुतार, जुबेर बागवान, अहिद बागवान, शाहेद बागवान, वसीम बागवान, इंझमाम बागवान, शेख तौफीक बागवान, शफीक बागवान, सद्दाम बागवान, रवी शिंदे, दीपक शिंदे, ओम लोखंडे, दिगांबर फुलारी, मंगेश अवस्थी, पप्पू ठक्कर, गोविंद जाधव, मयूर बागवाले, सोमनाथ देवाज्ञ, लखन वाळके, सुदर्शन विभुते, भैय्या गायकवाड, विजय अंगद जाधव, दिनेश आव्हाड, सोमनाथ बदने, विेश्वनाथ पांजरकर, कृष्णा सुरवसे यांच्या विरोधात कलम 143, 336, भां.दं.वि.सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिडकेंसह इतर पोलीस अधिकारी शहरामध्ये तळ ठोकून आहेत.











