नेकनूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींअंतर्गत जलजीवन अंतर्गत कामे करण्यात आली. काही ठिकाणी बोगस काम झालेले आहे. बोगस कामाबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी देखील करण्यात आलेलेआहेत. नेकनूर येथील काम लहाने कन्स्ट्रक्शन्सने केले असून हे काम अत्यंत बोगस दर्जाचे आहे. बोगस कामे करणार्या कॉन्ट्रॅक्टरविरोधात कारवाई करण्याची मागणी सरपंचासह ग्रा.पं.सदस्यांनी केली आहे. तसे निवेदन आज नेकनूर पोलिसांकडे दिले आहे.
गावकर्यांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जलजीवन पाणीपुरवठ्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेकनूरचं काम लहाने कन्स्ट्रक्शन्सला मिळालेले असून या कन्स्ट्रक्शन्सने काही प्रमाणात काम केले. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. याबाबत ग्रामपंचायतने संबंधित विभागाकडे तक्रार देखील केलेली आहे. आज सरपंच सुंदर लांडगे, उपरसरपंच सचीन शिंदे, सदस्य सय्यद साजीद, शिवाजी शिंदे, राजा भैय्या, नदीम मंडोला, शेख रहीम, शेख इजहारोद्दीन, जितेंद्र होमकर, जयदीप काळे, सुंदर बापू, चंद्रकांत शिंदे, शेख रिजवान, सय्यद बबलू, विलास राऊत यांनी नेकनूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दोषींविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.