बीड, (रिपोर्टर)ः- शहरांमधील अंकुश नगर भागामध्ये नगर परिषदेची पाण्याची टाकी आहे नगरपालिकेच्या ेशिप ीरिलश मध्ये असून या साठी जनतेचे लाखो करोडो रुपये खर्च करून अंकुश नगर ते पाण्याची टाकी असा सिमेंट काँक्रेट चा रस्ता बनवण्यात आला आहे हा रस्ता पाण्याच्या टाकीसाठी बनवला गेला असून या रस्त्याला प्लॉटिंग व्यवसायिक पुढे नेण्यासाठी नगरपालिकेच्या ओपन स्पेस मधून व पाण्याच्या टाकीला चिटकून तिचे कंपाउंड पाडून सिमेंट काँक्रेट चा रस्ता बनवत आहे तरी नगरपालिका व नगरपालिकेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत जर हा रस्ता पाण्याच्या टाकी साठी बनला तर पुढे हा रस्ता प्लॉटिंग व्यवसायकाने स्वतःच्या जागेमधून घेऊन गेले पाहिजे तसे न होता हा रस्ता नगर परिषदेच्या जागेतून जात आहे पुढे येथील राहणार्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागेल व नगरपालिकेचा जो ेशिप ीरिलश आहे तो भूमाफिया त्यावरती अतिक्रमण करून सिमेंट काँक्रेट चा रस्ता बनवून स्वतःच्या स्वार्थासाठी करत
आहे हे निदर्शनास आणून देण्याचेकाम आम आदमी पार्टीने वारंवार केले आहे परंतु
बीड नगर परिषदेने यावरती योग्य ती कारवाई केली नाही व पाण्याच्या टाकी पासून योग्य त्या अंतरावर रोड किंवा बांधकाम व्हायला पाहिजे सर्व नेमाचे उल्लंघन करून येथे सिमेंट काँक्रीट चा रस्ता बनत आहे येथील नागरिकांना अशी शंका वाटते की यामागे नगरपालिका व प्लॉटिंग व्यवसाय या मध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे की काय असी चर्चा होत आहे आपण याची सर्वस्व चौकशी करून पाहणी करून त्यामध्ये प्लॉटिंग व्यवसायिक नगरपालिकेचे दोषी कर्मचारी अधिकारी इंजिनिअर यांच्यावर कडक कारवाई करावी असे आम आदमी पार्टीच्या वतीने आपणास आठ दिवसाच्या मुदतीवर निवेदन दिले होते परंतु पंधरा दिवस उलटून देखील आपण योग्य ते पाऊल उचललेले दिसले नाही म्हणून आम आदमी पार्टी 13/ 2/ 2024 रोजी मंगळवार रोजी सकाळी 10 वा. अंकुश नगर येथील पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन करणार आहे याची सर्वस्व जबाबदारी ही नगर प्रशासनाची व प्रशासनाची असेल असे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्य अधिकारी नगरपरिषद बीड यांना लेखी स्वरूपाचे देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी दादासाहेब सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष रामधन जमाले, जिल्हा सचिव भीमराव कुटे तालुका अध्यक्ष सय्यद सादिक शहराध्यक्ष कृष्णाजी जगताप तालुका अध्यक्ष प्रदीप आवसरमल ,इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ँ












