बीड, (रिपोर्टर)ः- एक वर्षाचे करार करून चार वर्षे मजुरी करून घेणार्या सर्जेराव धोंडीबा डोईफोडे याच्या विरोधात तीन दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
जया सुरेश लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, राजकीय वलय असणारा ऊसतोड मुकादम सर्जेराव धोंडीबा डोईफोडे (रा.डोईफोडेवाडी ता.केज. जि.बीड) येथील रहिवाशी असुन एका वर्षाच्या करारावर चार वर्षे मजुरी करून घेणार्या मुकादमावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी तसेच तिन वर्षाच्या मजुरीची रक्कम अदा करण्यात यावी या मागणीसाठी तीन दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू आहे.












