बीड (रिपोर्टर): नवीन बांधण्यात येणार्या जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या नियोजीत आराखड्यात आंदोलनकर्त्यांना मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात या मागरीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले.
बीड जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या ठिकाणी नियोजीत आराखड्यात आंदोलनकर्त्यांना जागेची उपलब्धी, पिण्यासाठी शुद्ध पाणी व स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी आणि नगर रोडवरील महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान नालीच्या बांधकामासाठी तोडण्यात आलेल्या शासकीय भिंत बांधण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी शेख युनुस, सुदाम तांदळे, रामनाथ खोड, मोबीन शेख, मुश्ताक शेख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.












