गेवराई (रिपोर्टर) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या कोल्हेर रोडवरील किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
शिवाजीनगर चौकात असलेल्या कोल्हेर रोडवरील संजय एजन्सी या किराणा दुकानचे पाठीमागून पत्रे उचकटून चोरट्यांनी आत घुसून रात्री दुकानातील किराणा सामान लंपास केले. सकाळी पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.