• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

डिसेंबर अखेरपर्यंत रेल्वे बीडला तर 2025 ला काम पुर्ण;दानवेंचा नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाबाबत आणखी एक दावा

by गणेश सावंत
March 7, 2024
Reading Time: 1 min read
0
डिसेंबर अखेरपर्यंत रेल्वे बीडला तर 2025 ला काम पुर्ण;दानवेंचा नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाबाबत आणखी एक दावा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

उमेदवारी पंकजांना की प्रितमला ते पक्ष ठरवील -दानवे
बीड (रिपोर्टर): इ.स. 1995-96 साली मान्यता प्राप्त झालेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला स्व. गोपीनाथराव मुंडेंमुळे गती मिळाली. 2014 नंतर गोपीनाथरावांनी लोकसभेत ही मागणी लावून धरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गावर बजेट टाकले. आता 99 टक्के जमीन हस्तांतरीत झाली असून मध्यंतरी राज्यात सत्तांतर झाल्याने रेल्वेला पैसे देण्यात आले नाही. मात्र आता राज्यात आपले सरकार आहे. त्यांनी 400 कोटी दिले. त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत रेल्वे बीडपर्यंत तर 2025 पर्यंत ही रेल्वे थेट परळीत जावून धडकेल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले. अद्याप कुणाचीही उमेदवारी निश्‍चित झाली नसून पार्लमेंट बोर्डाचा उमेदवारीबाबत जो निर्णय असेल तो आम्हा सर्वांना मान्य असेल. उमेदवारीबाबत पार्लमेंट बोर्डच निर्णय घेतं, असेही दानवेंनी या वेळी म्हटलं.


   ते आज बीड दौर्‍यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्या सोबत केंद्रिय अर्थराज्यमंत्री कराड, खा. प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दानवे म्हणाले की, या रेल्वे मार्गाचे भुसंपादनाचे काम ही 99 टक्के झाले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी पैसा आणि जमिनही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असे दानवेंनी सांगितले.


आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वे म मंत्री दानवे, अर्थराज्यमंत्री कराड, खा.प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग 1995-1996 ला मंजुर झाला. मात्र केंद्र आणि राज्य सरकार या कामासाठी पैसा उपलब्ध करून देत नव्हते. पण बीड लोकसभा मतदार संघातून भाजपाचे दिवंगत नेते स्व.गोपीनाथ मुंडे हे निवडून आले आणि या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळू लागला. नगर-बीड-परळी हा एकुण 261 कि.मी चा रेल्वे मार्ग असुन यासाठी जवळपास 4 हजार 800 कोटी रूपये खर्च येत आहे. या रेल्वे मार्गासाठी नगर पासुन बीडपर्यंतचे सर्व भुसंपादन पुर्ण झाले असुन 25 मार्च नंतर परळी कडुनही सिरसाळ्यापर्यत या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होणार आहे. नगरपाासुन ही या काम सुरू असुन डिसेंबर 2024 मध्ये बीडपर्यंत रेल्वे धावेण असे सांगत या रेल्वे मार्गावरील दोन मोठे पुल आणि परळी स्टेशन नजीकची जागा यामुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. त्या सोबतच परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनने स्वतःच्या खर्चातून परळी स्टेशन पर्यंत एक रेल्वे पटरी तयार केली होती. या पटरीच्या दुरूस्तीसाठी थर्मल्ला रेल्वे बघायला 1 लाख 36 हजार वार्षीक भाडे देत होते. हे वार्षीक भाडे रद्द करावे अशी मागणी थर्मल पॉवर स्टेशनकडून वारंवार होती. या दोन तीन आडथळ्यामुळे काही काम धिम्या गतीने होत असल्याने ेआणि मध्यंतरी कोरोना साथीमुळे या कामात अडथळा आला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर 2025 पर्यंत नगर-बीड-परळी रेल्वे धावेलच. या मार्गाच्या इलेक्ट्रीशयनला मंजुरी नव्हती मात्र तिही मंजुरी रेल्वे बोर्डाने दिली असुन त्याचेही काम 25 मार्च नंतर लगेचच सुरू होईल असे ही यावेळी दानवे यांनी सांगितले.

बीडची उमेदवारी पंकजा की प्रितम याचा निर्णय भाजप संसदीय बोर्ड घेईल
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. कोणत्या लोकसभा मतदार संघातून कोणी लढावे हे आम्हाला माहित नसते पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडतो. बीड लोकसभा मतदार संघातून डॉ.प्रितम मुंडे लढणार की पंकजा मुंडे हे आम्हाला काहीच  माहिती नाही. मिही स्वतः जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे, संभाजीनगरमधून डॉ.भागवत कराड निवडणूक लढवण्यास तयार आहे मात्र प्रितम, पंकजा, मी किंवा कराड आमच्या सगळ्यांच्या बाबतीत भाजप संसदीय बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. त्यामुळे बीडमधून पंकजा लढणार की प्रितम हे भाजपीय सांसदीय पक्ष बोर्डालाच माहिती आहे.

Previous Post

ना.मुंडे म्हणाले, रेल्वेचे काम परळीकडून का सुरू होत नाही?दानवेंनी बैठकीतून रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांना लावला फोन

Next Post

आरटीई प्रवेश प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू ,18 मार्चर्पंत नोंदणी करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
आरटीई प्रवेश प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू ,18 मार्चर्पंत नोंदणी करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

आरटीई प्रवेश प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू ,18 मार्चर्पंत नोंदणी करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?