बीड (रिपोर्टर): अवैधरित्या वाळू घेऊन जाणार्या हायवाला पोलिसांनी पकडले असता सदरील हायवा चालक हायवा सोडून पळून गेला. या गाडीमध्ये तीन ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी हायवासह वाळू जप्त केली. या प्रकरणी चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरित्या वाळू घेऊन जाणार्या हायवा (क्र. एम.एच. 16 ए.ई. 9998) या गाडीमध्ये वाळू असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील गाडी पकडली असता चालक गाडी घटनास्तळी सोडून पळून गेला. या गाडीमध्ये तीन ब्रास वाळू आढळून आली. ही कारवाई बोरगाव शिवारातील डेरमाता येथे करण्यात आली. या प्रकरणी कैलास खटाणे यांच्या फिर्यादीवरून हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0000
दारू पिण्यास पैसे दिले नाही
दुकानदारास रॉडने मारहाण
परळी (रिपोर्टर): दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही? या कारणावरून एका व्यावसायिकास रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना परळी शहरामध्ये घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत इंद्रजित कस्तुरे (रा. हनुमानगर, परळी) हे आपल्या दुकानात एका ग्राहकाची कटींग करत असताना श्रीनाथ गंजेवार हा तेथे आला व त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे देण्यास नकार दिल्याने श्रीनाथ गंजेवार व सोमनाथ जाधव या दोघांनी अभिजीत कस्तुरे यास रॉडने मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी दोघा जणांविरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












