संसार उपयोगी सामानसह इतर वस्तू जळून खाक
तलाठ्याकडून पंचनामा 3 ते 4 लाखाचे नुकसान
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील प्रभाग 1 मध्ये मोलमजुरी करुन उपजिविका भागविणाऱ्या महिलेच्या घराला काल दुपारी अचानक आग लागली असून यामध्ये राहते पत्राचे घरासह संसार उपयोगी व इतर सामान जळून खाक झाले आहे. तर या घटनेचा वडवणी तलाठी यांनी पंचनामा केला आहे. यामध्ये 3 ते 4 लाखाचे नुकसान देखील झाले असून यामध्ये जिवित हानी टळलेली आहे.
वडवणी शहरातील प्रभाग क्रं. 1 मधील वडार वस्तीच्या बाजूला रागिनी शाम गरवारे यांचे पत्राचे घर आहे. खाजगी दवाखान्यात रोजणदारीवर काम करुन उदारनिर्वाह भागवातात. काल दुपारच्या वेळी रागिनी गरवारे यांच्या आई घरात होत्या. घरातील गँस टाकी लिंकेज झाली असल्याने घरात आगीने पेट घेतला असल्याचे समजून आल्या नंतर तात्काळ वयोध्द महिला या बाहेर आल्या त्याच वेळी अचानक आगीने संपुर्ण घराला पेट घेतला. यामध्ये संसार उपयोगीसह इतर सामान जळून खाक झाले आहे. यामध्ये 3 ते 4 लाखाचे नुकसान झाले असून या घटनेचा वडवणी तलाठी यांनी तात्काळ पंचनामा केला आहे. तर यामध्ये प्रसंग अवणधनाधे जिवित हानी टळली आहे. हि वार्ता समजताच न.प. अग्निशामक गाडीने घटनेकडे धाव घेत कर्मचाऱ्याच्या वतीने आग विझविण्यात आली आहे.
पंचनामा केला आहे – जि. के. वडमारे
सदरील घटना हि काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समजली आसता आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे.हि घटना गँस टाकी लिंकेज असल्यामुळे झाली आहे असे प्राथमिक माहिती सांगितली आहे. यामध्ये पत्राचे घर तसेच यामधील संसार उपयोगी वस्तूसह इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. 3 ते 4 लाखाचे नुकसान देखील झाले आहे. अशी माहिती वडमारे तलाठी सज्जाचे तलाठी जि. के. वडमारे यांनी दिली आहे.












