बीड (रिपोर्टर): बहुजन वंचीत आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ आज अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची अंबाजोगाई शहरामध्ये सहा वाजता जाहीर सभा होतआहे. अॅड. आंबेडकर काय बोलतात?याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरू आहे. बीडमध्ये बहुजन वंचीत आघाडीच्या वतीने अशोक हिंगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हिंगे यांच्या प्रचारार्थ आज अंबाजोगाई शहरातील मार्केट ग्राऊंड या ठिकाणी सहा वाजता अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेतून अॅड. आंबेडकर काय बोलणार, कोणावर निशाना साधणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.










