बीड (परळी) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांची परळी शहरात भव्य रॅली निघाली.
याबाबतची माहिती अशी की, बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांची दिनांक 11 मे रोजी परळी शहरातून भव्य अश रॅली आयोजित करण्यात आली होती.यावेळी बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते, सुदामती गुट्टे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, डॉ नरेंद्र काळे यांच्यासह मतदार सहभागी झाले होते. मान्यवरांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्या नंतर रॅलीला सुरुवात झाली. रस्त्यात छ्त्रपती शिवाजी महाराज, आण्णाभाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. रॅली चा समारोप मोंढा मैदानातील टॉवर जवळ करण्यात आला या प्रसंगी झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना बजरंग सोनवणे यांनी भाजप टीका करताना म्हंटले की, आमच्या सभेला प्रचंड गर्दी होत असून विरोधकांच्या सभेत मात्र खुर्च्या रिकाम्याच असतात हीच त्यांची लोकप्रियता आणि त्यांची केलेल्या कामांची पावती असल्याची कोपरखळी मारली.
दरम्यान त्यांनी पिंपळा धायगुडा, वाघाळा, राडी येथे भेटी दिल्या. यावेळी गावकर्यांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली.














