• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home लोकसभा २०२४

पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, अशोक हिंगेंसह 41 उमेदवारांचे सायं. 6 वाजता भवितव्य मतपेटीत बंद होणार

by गणेश सावंत
May 13, 2024
Reading Time: 1 min read
0
पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, अशोक हिंगेंसह 41 उमेदवारांचे सायं. 6 वाजता भवितव्य मतपेटीत बंद होणार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंडे भाऊ-बहिणींनी घेतं वैद्यनाथाचं दर्शन; नाथर्‍यात केलं मतदान
बजरंग सोनवणेंनी सारणीत बजावला मताचा हक्क
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्तात दुपारपर्यंत 34 टक्के मतदान

बीड/परळी/केज (रिपोर्टर): राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभेसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून जिल्हाभरातल्य 2 हजार 355 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली असून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान होत आहे. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मतदान अत्यंत शांततेत होत आहे. कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी एक वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात 34 टक्के मतदान झाले आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर नाथरा या गावी आपल्य मताचा अधिकार बजावला तर महाआघाडीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांनी आपल्या सारणी गावी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघात तब्बल 41 उमेदवार निवडणूक रिंगणात असून या सर्वांचे भवितव्य सायंकाळी सहा वाजता मतपेटीत बंद होणार आहे. खरी लढत ही मुंडे विरुद्ध सोनवणे यांच्यात होताना दिसून येत आहे. मतदारांमध्ये उत्साह असल्याचे पहावयास मिळत आहे.  


    महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची लढत पहावयास मिळत असून 35 -40 दिवसांच्या प्रचारानंतर आज प्रत्यक्षात जिल्ह्यातल्या 2 हजार 355 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन आपल्या नाथरा गावी मतदानाचा हक्क बजावला.

इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आपल्या सारणी या गावी जावून मतदानाचा हक्क बजावला.

वंचीतचे अशोक हिंगेंसह अन्य चाळीस उमेदवारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी, गेवराई, माजलगाव, बीड, केज, परळी या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत सुरू आहे. उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने सकाळीच मतदान केंद्रावर लांबलचक रांगा पहायला मिळत होत्या. काही ठिकाणी कार्यकर्त्यात शाब्दीक चकमक वगळता कुठेही अनुचीत प्रकार अथवा अनुचीत घटना घडल्याचे दुपारपर्यंत दिसून आले नाही. बीड जिल्ह्यातला मतदार साक्षर आणि सुज्ञ असल्याने मताचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे. बीडमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 34 टक्के मतदान. मतदान झाले होते. महायुतीच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडक्षचे बजरंग सोनवणे, वंचीतचे अशोक हिंगे यांच्यासह 41 उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी सहा वाजता मतदान यंत्रणेत बंद होणार आहे.

अनेक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा चोख
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केल्याचे दिसून येते. मतदाांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना आखल्याचेही पहायला मिळाले. काही ठिकाणी पाळणाघर दिसून आले तर अंबाजोगाईच्या मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंटही पहावयास मिळाले.

जिल्हाधिकारी, एसपींनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज सकाळीच आपल्या मताचा हक्क बजावला. दुसरीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही मतदान केले. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे आणि मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, एसपी या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांनी केले.

Previous Post

पीआय बांगरचा पाडळसिंगीत धिंगाणा;लाठ्यांनी तरुणांना बदडले; काही काळ तणाव

Next Post

beed loksabha update-दुपारी ३ वाजेपर्यंत परळी ,माजलगाव, केज मतांचा टक्का वाढला

संबंधित बातम्या

अग्रलेख

जयहिंद….!

by गणेश सावंत
May 7, 2025
क्राईम

25 मिनिटांत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त;

by गणेश सावंत
May 7, 2025
पवार साहेब, तुमचा आमदार निष्क्रीय अन् तुमच्या मुस्लीम समाजाबाबतच्या वल्गनाही पोकळ
महाराष्ट्र्राचे महाभारत

पवार साहेब, तुमचा आमदार निष्क्रीय अन् तुमच्या मुस्लीम समाजाबाबतच्या वल्गनाही पोकळ

by गणेश सावंत
November 9, 2024
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुंडगिरी किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला नाही-डॉ.दिपाताई क्षीरसागर
बीड

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुंडगिरी किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला नाही-डॉ.दिपाताई क्षीरसागर

by गणेश सावंत
November 8, 2024
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
महाराष्ट्र्राचे महाभारत

संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!

by गणेश सावंत
November 7, 2024
Next Post
beed loksabha update-दुपारी ३ वाजेपर्यंत परळी ,माजलगाव, केज मतांचा टक्का वाढला

beed loksabha update-दुपारी ३ वाजेपर्यंत परळी ,माजलगाव, केज मतांचा टक्का वाढला

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?