शिरूर (रिपोर्टर): शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकात असलेल्या आठ ते दहा दुकानांना अचानक आग लागल्याने यामध्ये लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. अचानक आग दहा दुकानांना लागल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाला कळवल्यानंतरही ते वेळेत पोहचू शकले नसल्याने दुकाना जळून खाक झाल्या. सदरची घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली.

शिरूर येथील जिजामाता चौकामध्ये एकलगट असलेल्या दहा दुकानांना रात्री अचानक आग लागली. सदरची आग प्रथमदर्शी शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येते. आग लागल्यानंतर आगीची तीव्रता भयान असल्याने एका पाठोपाठ एक दुकाना आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या. आगीची तीव्रता अधिक असल्याने आग विझवण्याचा प्रयत्न करणार्यांनाही आग जवळ येऊ देत नव्हती. आग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली मात्र वेळेत अग्निशामक दल त्याठिकाणी पोहचू शकले नाही.

त्यामुळे दुकाना जळून खाक झाल्या. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.












