बीड (रिपोर्टर): विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना ऑनलाईन पॉर्म भरून देण्यासाठी नारी शक्तीचे अॅप तयार केले. हे अॅप 24 घंटे बंद असून या अॅपवर गेल्यानंतर त्याचे सर्व्हर डाऊन असल्याचा नेट वाल्यांकडून सांगितले जाते. रात्री बेरात्री जागून महिलांचे नातेवाईक या अॅपवर फॉर्म भरल्यानंतर ना ओटीपी येतो ना सर्व्हर चालू असते त्यामुळे लाडकी बहीण योजनेत सावळा गोंधळ सुरू असून राज्य सरकारने या अॅपऐवजी पोर्टल सुरू करावे, अशी सर्वत्र मागणी आहे.
राज्यात लाखो महिलांची संख्या असताना एका अॅपवरून एवढ्या महिला व त्यांचे नातेवाईक फॉर्म भरण्यासाठी जात असतील तर ते नेहमी सर्व्हर डाऊनच राहणार नेट कॅफे किंवा सेतूमध्ये महिला िकिंवा त्यांचे नातेवाईक आपले कामधंदे बुडवून दिवसभर जाऊन बसतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी गेल्यानंतर रिकाम्या हातीच संबंधित महिला िकिंवा त्यांच्या नातेवाईकांना परतावे लागते. याबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सरकारी विभागाच्या महिला बालकल्याण अधिकार्यांना विचारले असता ते प्रत्येक दिवशी अॅपमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे, चारपाच दिवस लागतील, असे सांगतात. अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्याकडे ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी कोणीही धजवात नाही. काहींनी ऑफलाईन फॉर्म भरूनही अंगणवाडी सेविकांना दिले तर या सेविका दिवसभर अॅप चालत नसल्यामुळे रात्रीच्याला फॉर्म कसे भरणार, रात्री बारा एक वाजता या अंगणवाडी सेविका संबंधित महिलांना दूरध्वनी तरी कसे करणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे नारी शक्ती नावाचे अॅप बंद करून ते पोर्टल सुरू केले तर या योजनेला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.










