पंकजांसह अकरा जणांचे भवितव्य चार वाजता मतपेटीत बंद होणार
जेलमधील भाजपा आमदार गणपत गायकवाडांच्या मतदानावरून आरोप-प्रत्यारोप
मुंबई (रिपोर्टर): विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी गुप्त पद्धतीने आमदारांच्या मतदानाला सुरुवात झाली असून अकरा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. कुठल्या पक्षाचा आमदार या निवडणुकीत पराभूत होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असून मतदानापूर्वी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेत आमचे सर्वच उमेदवार विजय होणार असल्याचे म्जहटले. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून निवडणूक मतदान प्रतिनिधी म्हणून राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडणुकीत घोडाबाजार होण्याची दाय शक्यता असल्याचे माध्यमं सांगत असून सर्वच पक्ष आपले उमेदवार विजयी होणार, असे सांगत आहेत. गोळीबार प्रकरणात जेलमध्ये असलेले भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून सत्ताधारी आणि विरोधकात आरोप-प्रत्यारोपही झाले. विरोधकांच्या मते गणपत गायकवाडांना मतदान करू दिले जाऊ नये, असे सांगण्यात येते.
विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने सदरची निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी थेट गुप्त मतदानाने होत आहे. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून ज्यांच्याकडे 23 मतांचा कोटा पुर्ण होईल ते उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसर्या आणि गरज पडली तर तिसर्या पसंतीची मते मोजले जातील, आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत विधान भवनामध्ये 227 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पुर्ण होत भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यासह 12 जणांचे भवितव्य चार वाजता मतपेटीत बंद होणार आहे. मतदानापूर्वी पंकजा मुंडे यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. या वेळी आपण तर निवडून येणार, परंतु आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार गटाकडून राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि अनिल पाटील हे निवडणूक प्रतिनिधी ठरविण्यात आले. मतदानाला एकीकडे सुरुवात होत असताना दुसरीकडे गोळीबार प्रकरणात जेलमध्ये असलेले आ. गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून आरोप-प्रत्यारोप झाले. तर ही निवडणूक चुरशीची होत असल्याने ‘आमदारावर डाऊट कोण होणार आऊट, विधान परिषद निवडणुकीत कुणाची होणार फाटाफूट’ असे चित्र सध्यातरी पहावयास मिळत असून काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता एकीकडे वर्तविण्यात येत असली तरी काँग्रेसकडून आमची मते फुटणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले जाते. सायंकाळी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत या सर्वांचे भवितव्य मतपेटीत असणार आहेत.