मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात, याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं ’मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणार्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ’मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशभरातील 73 आणि महाराष्ट्रात 66 धार्मिक स्थळांची यादी केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ यात्रेची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं देशभरातील 73 आणि राज्यातील 66 अशा 139 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच राज्य मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला मंजुरी दिली. या योजनेची माहिती देणारा जीआर रविवारी प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या योजनेची घोषणा केली होती.