नगर (रिपोर्टर): ज्या देशाची महिला सक्षम असते, तो देश जगाच्या पाठीवर सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतो. म्हणून आम्ही राज्यभरातील भगिनींना माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत प्रतिमहिना दीड हजार रुपये देत असून जुलै-ऑगस्टच्या मध्यान्वी म्हणजे रक्षाबंधनाची भाऊबीज एकाच वेळी दोन महिन्याचे तीन हजार रुपये माझ्या बहिणींना थेट त्यांच्या बँक खात्यात देणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. ते नगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये ‘माझी लाडकी बहीण’ संवाद कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचा सत्कार केला. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथील संत श्री साईबाबांचे दर्शन घेऊन तेथील प्रसादही मुंडेंनी अजित पवारांना दिला.
नगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘माझी लाडकी बहीण’ संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली. या वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अजित पवार म्हणाले,
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आवश्य भरा. तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहे. प्रशासनातील सहकारी, अंगणवाडीत काम करणार्या माझ्या महिला करतात. तो फॉर्म नीट-नेटका भरा. ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तरी काळजी करु नका. नवीन योजना आहे, थोड्या अडचणी येऊ शकतात. 1 जुलैपासून ही योजना सुरु केली आहे. आम्ही अजून तुम्ही फॉर्म भरला नाही, तर पैसे कसे मिळतील, असे प्रश्नही उपस्थितीत होतात. पण याबद्दलची सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली आहे, असे अजित पवारांनी म्हटले.
दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार
तुमच्या अकाऊंटला आम्ही दर महिना 1500 रुपये देणार आहोत. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील. त्यामुळे काळजी करु नका. ज्या गरीब माय माऊली आहे, त्यांच्या काही गरजा भागवण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरुन माझ्यावर विरोधकांनी टीका केली. सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.