Devendra Fadnavis, नागपूर : “अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर त्यांनी बनविलेला सीपी आरोप करतो. सीबीआय केस दाखल करतात कोर्टाने जेलमध्ये पाठवलं, पण आज ते म्हणतात फडणवीस माझ्यावर कारवाई करायला सांगतात माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो. यांच्यावर बोलणं मी माझा कमी पण समजतो. मात्र नागपूर जिल्ह्यातील लोकांना माहित असावं म्हणून मी बोलाव लागतं”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
अभिमन्यूला चक्रव्यूव्हात जात आलं पण बाहेर येत आलं नव्हतं मी तसा नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अभिमन्यूला चक्रव्यूव्हात जात आलं पण बाहेर येत आलं नव्हतं मी तसा नाही; मी चक्रव्यूव्ह भेदून बाहेर येणार आहे. त्यांना माहीत आहे एकावर अटॅक केला की, यांना कमी करता येऊ शकतं, घेरता येऊ शकत म्हणून यांची लोक सकाळी उठले की भोंगे वाजवतात. माझी ताकत माझी जनता आहे. फडणवीसची ताकत ही जनता आहे माझे कवच कुंडल आहे.
विरोधकांप्रमाणे मार्केटिंग करत नाही,आता आपली काम तुम्ही दाखवा
आपले कार्यकर्ता काम चांगले करतात. मात्र विरोधकांप्रमाणे मार्केटिंग करत नाही,आता आपली काम तुम्ही दाखवा. हे लोक एवढे हुशार आहे ते निवडणुकी पुरत्या घोषणा करतात. मार्केटिंग करतात त्यामुळे तुम्ही आपलं मार्केटिंग करा आपले काम जनतेला दाखवा. अनेक कार्यकर्ते थकले होते , चालते तर चालू द्या असं करत होते.अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहे ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं.
सावनेरमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार
सावनेरमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे. जिल्हा बँक घोटाळा 22 वर्ष पूर्वी झाला. त्यांना कोर्टाने शिक्षा दिली पण ते म्हणतात भाजपवाले आमच्या मागे लागले. भाजप कोर्टाला सांगते का यांची वसुली करा यांना साथ द्या, अशी टीकाही फडणवीस यांनी नाव न घेता सुनील केदार यांच्यावर केली. जिल्हा बँक जीवंत असती तर माझ्या शेतकऱ्यांना इतका त्रास सहन करावा लागला नसता, पण ते लोक असे दाखवतात त्यांनी खूप मोठी मर्दुमकी दाखवली, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.