मार्टीच्या घोषणेने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण
मार्टीमुळे शैक्षणिक दिशा मिळेल, विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल -धनंजय मुंडे
बीड/परळी (रिपोर्टर): अल्पसंख्यांक समाजाला शैक्षणिक दिशा मिळावी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी राज्यातील महायुती सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आग्रहास्तव एमआरटीआय अर्थात मार्टी योजनेला मंजुरी देत ती सुरू केली. या योजनेमुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता येईल. पदवी-पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठी मदत होणार आहे. हे सर्व अजितदादांमुळे झाल्याचे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले.
ते एमआरटीआयची घोषणा झाल्यानंतर त्यांचा सत्कार संपादक शेख तय्यब यांच्यासह शिष्टमंडळाने केला. त्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी संपादक शेख तय्यब यांच्या सोबत जिल्हाप रिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, महादेव धांडे यांच्यासह शेख तय्यब मित्र मंडळ परिवार उपस्थित होता. या शिष्टमंडळात शेकडो सदस्य उपस्थित होते. राज्यातील महायुती सरकारने एमआरटीआय अर्थात मार्टीची घोषणा केल्यानंतर काल राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानत शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला. मुस्लिम समाजाला शैक्षणिक दिशा मिळावी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल व्हावे यासाठी मार्टी या योजनेची नितांत गरज होती म्हणून संपादक शेख तय्यब यांनी वेळोवेळी ना. धनंजय मुंडे यांना ही योजना पुर्णत्वाकडे नेण्याबाबत पाठपुरावा केला. त्याचे महत्व लक्षात घेता ना. मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदरची योजना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाची असल्याचे लक्षात आणून दिचले. त्यानुसार दादांच्या प्रयत्नातून ही योजना सुरू झाली. काल संपादक शेख तय्यब यांच्यासह शिष्टमंडळाने ना. धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानत सत्कार केला. या वेळी सत्काराला उत्तर देताना ना. मुंडे म्हणाले, दादांच्या पुढाकारातून ही योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे मुस्लिम समाजाला शैक्षणिक दिशा मिळेल, विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होईल, परदेशातील शिक्षणासह पदवीधर, पदव्यूत्तर शिक्षणाचा मार्ग सोपा होईल. गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक निकडीशिवाय शिक्षण पुर्णत्वाकडे नेता येईल. असे ना. मुंडे म्हणाले.