98 वस्तीशाळा इमारतीविना
बीड (रिपोर्टर)ः- जिल्ह्यातील 98 वस्तीशाळा इमारतीविना असून सदरील शाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहे. शिक्षण विभागाने यावर तात्काळ भूमीका घेवून इमारत उपलब्ध करुन दयावी अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरवुन शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
बीड जिल्ह्यामधील 98 वस्तीशाळांना स्वताःची इमारत नाही. मुलांना उघडयावर किंवा पत्र्याचे शेडमध्ये ज्ञानाचे धडे गिरावावे लागत आहे. शासनाचे इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाने 98 शाळांना इमारत बांधून दयावी या मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरवली. यावेळी डॉ.गणेश ढवळे, शेख युनूस, शेख मुबीन, मुस्ताक शेख,शिवोवर्मा शेलार,अशोक येडे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.