• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

संपन्न समृद्ध आणि औद्योगिक दृष्ट्या अव्वलबीड जिल्हा घडवू या- धनंजय मुंडे

by गणेश सावंत
August 16, 2024
Reading Time: 1 min read
0
संपन्न समृद्ध आणि औद्योगिक दृष्ट्या अव्वलबीड जिल्हा घडवू या- धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दिमाखदार सोहळ्यात 78 वा स्वातंत्र्यदिन संपन्न
बीड (रिपोर्टर): येणार्‍या काळात पायाभूत सुविधांनी समृद्ध कृषीसंपन्न आणि औद्योगिक दृष्ट्या राज्यात अव्वल असा बीड जिल्हा घडवू या, असे आवाहन कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केले


     येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ तसेच जिल्हा परिषद प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता डी. पाटील आदींसह सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लोकाभिमुख योजनांची आखणी आणि अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. राज्यातील प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी महिला तसेच युवकानं पर्यंत विकासाचा लाभ पोहोचत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यातील 2 कोटीहुन अधिक बहिणींना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य मिळवून देणारी ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ ही महत्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली असून पहिल्या 2 महिन्यांचे प्रत्येकी 3 हजार रुपये अर्थसहाय्य थेट या बहिणींच्या खात्यात राखीपौर्णिमेपर्यंत मिळणार आहेत. आपल्या बीड जिल्हयात 3 लाख 45 हजार भगिनी आतापर्यंत पात्र ठरलेल्या आहेत. केंद्र शासनाची उज्ज्वला योजना आणि लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी भगिनींना प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची ’मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ देखील राज्य सरकारने सुरू केली आहे. असेही त्यांनी सांगितले.  दि. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेला प्रत्येक मुलीच्या सक्षमीकरणासाठी ’लेक लाडकी योजना’  राज्य शासन राबवित आहे. या अंतर्गत आपल्या जिल्ह्यात 873 लाभार्थीना 43 लाख 75 हजार रुपये इतका लाभ शासनाने दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


   गेल्या वर्षी खरिप हंगामापासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली. बीड जिल्ह्यात 2023-2024 च्या खरीप व रब्बी हंगामात मिळून 400 कोटी 24 लाख रुपये पीकविमा मंजूर करण्यात आला असून यापैकी आतापर्यंत सुमारे 379 कोटी रुपयांचे वितरण शेतकर्‍यांना करण्यात आले असून, उर्वरित 21 कोटी रुपये वितरित करणे सुरू आहे. याशिवाय विमा कंपनीने कोणतेही कारण न देता नाकारलेले विमा प्रस्ताव मंजूर करून त्याही शेतकर्‍यांना येत्या काही दिवसात पीकविमा मिळणार आहे. चालू हंगामात खरिप पिकासाठी 17 लाख 14 हजार विमा अर्ज सादर करून लाखो शेतकर्‍यांनी याही वर्षी एक रुपयात पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे.असे सांगून पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले की वेळोवेळी होणारी अतिवृष्टी, वादळ वारा, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींच्या भरपाईपोटी गेल्या 2 वर्षात 7 लाख 21 हजार 607 शेतक-यांना 593 कोटींहून अधिक रकमेची भरपाई थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
          थेट  लाभाच्या योजना शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढावे यासाठी थेट लाभाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसोबतच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्हयातील 3 लाख 89 हजार शेतक-यांना 108 कोटी 14 लाख रुपयांचा लाभ शासनाने दिला असून थेट लाभाचाच एक भाग म्हणून शेतीतील वीज बिलात सवलत म्हणून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सरकारने जाहीर केली आहे. या योजनेमुळे 7.5(साडेसात) एच पी पर्यंतच्या कृषीपंप वापरणार्‍या शेतकर्‍यांना मोफत वीज मिळणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. 2029 पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.यंदा चांगल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना उत्पादन वाढीची संधी आहे याच भूमिकेतून जिल्ह्यात या खरिप हंगामात 3 पट अधिक  
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह उभारणी तसेच बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय भवन बांधकाम, अद्ययावत कृषी भवन, कृषी महाविद्यालय, जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे काम यांच्या रूपाने जमिनीवर दिसणारा विकास आकारास येत आहे. या सर्वांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. असा विश्‍वास त्यांनी व्यकत केला.परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या सोबतीने जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक किल्ले व तीर्थक्षेत्रांचा विकास याकडे सरकारचे लक्ष असून या सर्वांचा विकास करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.असेही श्री मुंडे यावेळी म्हणाले. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जिल्हयातील खेळाडू व सैन्य दलातील जवान अविनाश मुकुंदराव साबळे यांच्या यशाचे कौतुक केले त्याचा जिल्हयालाच नव्हे तर देशाला अभिमान आहे असे ते म्हणाले.

Previous Post

लॉजमध्ये 25 वर्षीय तृतीयपंथ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे दरोडेखोर-नागरिकांत चकमक,दरोडेखोरांनी अंधाधूंद दगडफेक केली, हवेत गोळीबार .

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे दरोडेखोर-नागरिकांत चकमक,दरोडेखोरांनी अंधाधूंद दगडफेक केली, हवेत गोळीबार .

स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे दरोडेखोर-नागरिकांत चकमक,दरोडेखोरांनी अंधाधूंद दगडफेक केली, हवेत गोळीबार .

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?