आज सकाळी मृतदेह आढळून आला, वीज मंडळावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
नेकनूर (रिपोर्टर): शेळ्या घेऊन गेलेल्या एका मजुराचा विजेचा तारेला चिटकून मृत्यू झाल्याची घटना काल घडली. मात्र आज सकाळी या मजुराचा मृतदेह आढळून आला. या मजुराच्या या मृत्यूला वीज मंडळ दोषी असल्याचा आरोप करत वीज कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.
सर्जेराव सोनाजी गुळवे (रा. नेकनूर) हे काल डी.एड. कॉलेजच्या परिसरामध्ये शेळ्या घेऊन गेले होते.त याठिकाणी विजेची तार तुटून पडली होती. त्यांना या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा र्शाक लागून मृत्यू झाला. गुळवे हे रात्री घरी आले नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता. सकाळी त्यांचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर घयनास्थळी पोलीस कर्मचारी बळवंत, दादासाहेब उबाळे यांनी जावून पंचनामा केला. वीज वितरण कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.









